राहूरी विद्यापीठ / आर आर जाधव : मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यालयातील २ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत, १२ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत तर ४९विद्यार्थ्यांनी केंद्र स्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. विद्यालयातील चि. प्रणव सोन्याबापू भांड(इयत्ता २ री )राज्यात तिसरा, कु.आरोही पंडित पानसंबळ(इ. ३री) राज्यात चौथी आली.
कु. सान्वी हरीश जावळे (इ.पहिली)जिल्ह्यात पहिली, कु. अग्रजा मच्छिंद्र लोखंडे ( इयत्ता पहिली )जिल्ह्यात तिसरी,कु. कृष्णल संदीप रंजाळे (इयत्ता पहिली) जिल्ह्यात तिसरी,चि. स्वानंद संदीप इरोळे (इयत्ता पहिली) जिल्ह्यात पाचवा,चि. अद्वैत पंडित पानसंबळ (इयत्ता पहिली) जिल्ह्यात पाचवा, कु. सारा सलीम शेख (इयत्ता दुसरी )जिल्ह्यात दुसरी, कु.प्रशंसा संभाजी सोनवणे (इयत्ता दुसरी) जिल्ह्यात तिसरी, चि.दुर्वेश बाळासाहेब तमनर (इयत्ता दुसरी) जिल्ह्यात पाचवा, चि.आर्य संतोष जाधव (इयत्ता तिसरी) जिल्ह्यात पहिला,चि.वेदराज एकनाथ पानसंबळ (इयत्ता चौथी) जिल्ह्यात तिसरा, कु. वेदिका एकनाथ पानसंबळ( इयत्ता चौथी )जिल्ह्यात चौथी, चि.अवधूत राजेंद्र भुजाडी( इयत्ता चौथी) जिल्ह्यात चौथा आला.
तसेच इयत्ता पहिली ते चौथीमधील ४९ विद्यार्थ्यांनी केंद्र स्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक बाळासाहेब खेत्री सर त्याचबरोबर उपशिक्षक श्री विलास देशमुख, गोरक्ष उचाळे , ज्ञानेश्वर ढोकणे, दीपक म्हस्के , सुरेश गव्हाणे, सिमा गिरी , भाग्यश्री शेटे, सविता साळवे, सोनाली तारडे, दिपक खळेकर, किशोर वसावे, राजेश खळेकर, तृप्ती हारदे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा बारागाव नांदूर केंद्राच्या केंद्रप्रमुख आदरणीय सरस्वती खराडे मॅडम, माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहिरे सर,उपप्राचार्य बाळासाहेब डोंगरे सर यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.महानंद माने साहेब, खजिनदार श्री महेश घाडगे साहेब व सर्व सन्माननीय संचालकांनी अभिनंदन केले आहे.
Leave a reply