Disha Shakti

Uncategorized

जि.प.प्रा.शाळा, कोंढार चिंचोली या शाळेला स्वच्छ विद्यालय ‘ प्रथम पुरस्कार प्रदान

Spread the love

प्रतिनिधी (अक्षय वरकड) :  जि.प.प्रा.शाळा, कोंढार चिंचोली या शाळेला सोलापुर येथे ‘ स्वच्छ विद्यालय ‘ प्रथम पुरस्कार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी साहेब यांचे हस्ते, प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. श्री.किरण लोहार साहेब यांचे उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक श्री.हिराकांत शिंदे, गावचे सरपंच श्री. दिलीप काका गलांडे, शा. व्य.स.अध्यक्ष श्री.बापूराव गलांडे,आदिनाथ सह.सा.कारखान्याचे माजी संचालक श्री.राजेंद्र धांडे, ग्रा.पं. सदस्य श्री. महादेव कांबळे ( आबा ) यांनी स्विकारला.

या पुरस्काराच्या निमित्ताने सोलापुर जिल्हयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. दिलीप स्वामी साहेब यांनी गेल्या वर्षी ‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा ‘ हा उपक्रम संपुर्ण जिल्हयात राबवला व जिल्हयातील सर्व शाळांनी यात सहभाग घेऊन आपल्या शाळा रंगरंगोटी व वर्ग सजावट करुन स्वच्छ व सुंदर बनविल्या.

आमच्या शाळेनेही या उपक्रमात सहभाग घेऊन ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शाळा स्वच्छ, सुंदर व आकर्षक बनविली. करमाळा तालुक्याचे नूतन व उपक्रमशील गटविकास अधिकारी मा.मनोज राऊत साहेब यांनी याच वेळी तालुक्यातील सर्व शाळांमधून ‘सायन्सवॉल निर्मिती ‘ हा उपक्रम राबविला. साहेबांनी आमच्या शाळेला भेट देऊन शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली व कौतुक केले.

शाळेचा स्वच्छ निसर्गरम्य परिसर पाहून शाळेच्या मैदानात पृथ्वी क्षेपणास्त्र प्रतिकृती निर्माण करण्याची संकल्पना त्यांनी मांडली व त्यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेने ग्रामपंचायत, लोकसहभाग व शिक्षक या सर्वांच्या सहकार्यातून पृथ्वी क्षेपणास्त्राची आकर्षक सुबक प्रतिकृती निर्माण केली.बी.डी.ओ. साहेब यांच्या या नवोपक्रमाची दखल बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार संसदरत्न मा. सुप्रियाताई सुळे यांनी घेतली व आमच्या जि. प.प्रा.शाळेला सदिच्छा भेट दिली.

शाळेने राबविलेल्या विविध नवोपक्रमाची त्यांनी पाहणी केली व विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. सायन्सवॉल, शास्त्रज्ञांचे फोटो, सुसज्ज प्रयोगशाळा पाहुन शाळेचे व गावाचे भरभरून कौतुक केले. हा उपक्रम संपुर्ण राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले.

आज शाळेने मिळविलेल्या ‘ स्वच्छ विद्यालय ‘ या पुरस्काराच्या यशाचे मानकरी मा. गटविकास अधिकारी श्री. मनोज राऊत साहेब, माजी गट शिक्षण अधिकारी श्री.राजाराम भोंगसाहेब, माजी सेवानिवृत्त शि. वि. अ. श्री.अनिल बदे साहेब, सध्याचे गट शिक्षण अधिकारी श्री. राजकुमार पाटील साहेब, शि.वि.अ. श्री. नलवडे साहेब,जिंती केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. महावीर गोरे साहेब, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक आपण सर्वजण आहोत. याचे श्रेय सर्वांना आहे.

राज्याच्या टिमने शाळेचे ऑनलाइन मुल्यांकन केले त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. हिराकांत शिंदे सर यांना भगतवाडी शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक श्री. दहिफळे सर व विठ्ठलवाडी शाळेतून बदली झालेले शिक्षक श्री.ओहोळ यांचे सहकार्य लाभले त्यांचेही खूप खूप आभार !शाळा गावाची शान ! गावाला शाळेचा अभिमान. कोंढारचिंचोली गावातील सर्वच ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेने हे यश संपादन केले आहे.आपण सर्वांचे हार्दिक अभिनंदन ! व सर्वांना खुप खूप शुभेच्छा शाळेतील सर्व शिक्षकवृंद आपणा सर्वांचे ऋणी आहोत !

धन्यवाद. श्री. तानाजी पवळ सर ( कोंढार चिंचोली )


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!