अहमदनगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : शेवगाव येथील ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाचे मानद पशूकल्याण अधिकारी डॉ.धर्मराज सुरोसे यांनी नुकतीच गोसेवक पद्मश्री शब्बीर चाचा सय्यद यांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्यात गोसेवा आयोग स्थापन व्हावा याविषयी चर्चा केली.कृषी प्रधान देशाची गेली हजारो वर्ष देशाची गेली हजारो वर्ष शेती, चिकित्सा, व पर्यावरण याचे समतोल राखण्याचे रसायन भारतीय देशी गोवंशात आहे .तसेच गाय हि राष्ट्रीय भारतीय अर्थव्यवस्थेची व राष्ट्रीय एकात्मतेचेचे प्रतीक आहे.करण्यासाठी शेतकरी कुटुंबाची आर्थिक समृद्धी करण्यासाठी तसेच ग्रामीण अर्थक्रांतीसाठी देशी गाय संवर्धन करणे काळाची गरज आहे.याविषयी राज्य सरकारने राज्यात त्वरित गोसेवा आयोगाची स्थापना करून योग्य अंमलबजावणी करावी.
राज्यात गोसेवा विद्यापीठ स्थापन करून देशी गोविज्ञान हा विषय सर्व शालेय पाठ्यक्रमात अनिवार्य करणे. देशी गोवंश व त्याविषयीचे कृषी चिकित्सा गोसंवर्धन केंद्र निर्माण, करणे देशी गोवंश बीज शुद्धीकरणासाठी संशोधन केंद्राची स्थापना करणे , गाव तिथे गोशाळा उभारणीसाठी सहयोग करणे,गायरान जमिनीची गो संवर्धन कार्यासाठी उपयोग व्हावा यासाठी सरकारी धोरण अंमलबजावणी करणे ,जिल्हा निहाय गोविज्ञान संशोधन प्रशिक्षण केंद्राची स्थापना करणे , गाय आधारित रोजगार निर्मितीसाठी, खत निर्मिती ,बायोगॅस निर्मिती, औषध निर्मिती, बीज बँक निर्मिती , उत्पादन निर्मितीसाठी विशेष निधी व एम एस एम इ व एस सी एम योजना उपलब्ध करून देणे , गो कृषी व पशुसंवर्धन यासाठी सरकारी खाजगी संस्थांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे , गोवंशाचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी गोवंशासाठी फिरता दवाखाना सुरू करण्यात यावा , केंद्र व राज्य सरकार पशुसंवर्धन योजना गरजूपर्यंत पोहोचविण्यासाठी महाविद्यालयात गोसेवा समुपदेशन केंद्र सुरू करावेत ,पशुसंवर्धनासाठी गाव तेथे चारा बँक ,चारा डेपो निर्माण करावेत गो संवर्धन गुणवत्ता वाढीसाठी प्रोत्साहन पर राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात यावेत. राज्यस्तरीय ते ग्रामस्तरीय पशुसंवर्धन समिती स्थापन करावी यासाठी प्रशासकीय रचना निर्माण करावी.गोसेवा आयोग स्थापन करताना वरील मुख्य मुद्द्यांचा विचार करण्यात यावा अशी माहिती पशुकल्याण बोर्ड ऑफ इंडियाचे मानद पशुकल्याण अधिकारी डॉ.धर्मराज सुरोसे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यात गोसेवा आयोग स्थापन करण्यात यावा .या मागणीसाठी पशुसंवर्धन मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेण्यात येणार आहे असल्याची माहिती ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाचे मानद पशुकल्याण अधिकारी डॉ.धर्मराज सुरोसे यांनी दिली.