Disha Shakti

Uncategorized

डॉ.हनुमान लाल रायगर यांची महात्मा फुले कृषि विद्यापीठातील क्षमता असलेल्या पिकांच्या प्रक्षेत्रावरील राजगिरा व किनोवा पिकांची पाहणी

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / प्रमोद डफळ : महात्मा फुले कृषि विद्यापीठातील क्षमता असलेल्या पिकांवरील अखिल भारतीय समन्वयित संशोधन या प्रकल्पास भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे समन्वयक डॉ.हनुमान लाल रायगर यांनी क्षमता असलेल्या पिकांच्या अखिल भारतीय समन्वयित संशोधन या प्रकल्पास भेट देऊन राजगिरा व किनोवा या पिकांची प्रत्यक्षात पाहणी केली व उपस्थितीत शेतकऱ्यांना राजगिरा व किनोवा या पिकांची लागवड तंत्रज्ञान व उत्पादन व आहारातील महत्व याबद्दल उपस्थीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थीत शेतकऱ्यांना या प्रकल्पामार्फत महात्मा फुले कृषि विद्यापीठाची कृषिदर्शनी, ऑफिस बॅग,चारधारी वाल, राजगिरा व किनोवा या पिकांच्या बियाणाचे वाटप डॉ.हनुमान लाल रायगर, डॉ.विजू अमोलिक यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कृषि वन्स्पती शास्त्र विभागाचे विभाग प्रमूख डॉ.विजू अमोलिक व क्षमता असलेल्या पिकांवरील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाचे रोपे पैदासकार डॉ.मुकुंद भिंगारदे, कृषि सहाय्यक श्री.बापूसाहेब अडसुरे , कृषि सहाय्यक श्री.प्रदीप आग्रे, कर्मचारी अतुल डाडर, राहुल गावडे सह राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड, राहुरी खुर्द, डिग्रस, सडे या गावांतील शेतकरी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक डॉ.मुकुंद भिंगारदे यांनी केले व आभार कृषि सहाय्यक बापुसाहेब अडसुरे यांनी मानले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!