Disha Shakti

Uncategorized

दिव्यांग साठी कबोड टॉयलेट अर्ज संकलन शिबिर संपन्न

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / प्रमोद डफळ: दिव्यांग शक्ती सेवा संस्था व राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना यांच्या वतीने प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश लबडे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून दिव्यांगासाठी कमोड टाँयलेट बसविणेबाबत अर्ज भरणे या उपक्रमाअंतर्गत शिबीराचे आयोजन करून राहुरी नगरपालिका हद्दीतील दिव्यांगांना लाभ देण्यासाठी अर्ज भरून घेण्यात आले. लवकरच राहुरी नगरपरिषद व तालुक्याचे आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्याकडे प्रस्ताव सादर करून दिव्यांगांना कमोड टॉयलेट मिळवून देणार आहे असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले सदर शिबिरास दिव्यांगांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

सदर शिबिर मिनी आय.टी. आय. राहुरी येथे घेण्यात आला.तसेच श्री योगेश लबडे यांना वाढदिवसानिमित्त सर्वच उपस्थित पदाधिकारी तथा दिव्यांग सैनिकांनी पुष्प गुच्छ शाल देऊन शुभेच्छा दिल्या .वाढदिवसाचा अवांतर खर्च टाळून योगेश लबडे यांनी दिव्यांग शक्ती सेवा संस्थेस विविध उपक्रमासाठी १००० रुपये रक्कम देणगी देण्यात आली . दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या वतीने तालुक्याचे उपाध्यक्ष विठ्ठल पांडे यांनी योगेश लबडे यांचे आभार मानले .

विशेष म्हणजे राहुरी तालुका राबवित असलेले दिव्यांगांप्रती स्नेहपुर्ति वाढदिवस सर्वत्र बहुचर्चित झाले असून इतरांना मार्गदर्शक ठरतात. दिव्यांगांच्या अडीअडचणी प्रश्न त्यावरिल उपायोजना यावर सर्व उपस्थित पदाधिकार्यांमध्ये चर्चा झाली संस्थेच्या वतीने दिव्यांगांच्या अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या निश्चित प्रयत्न करणार आहे असे प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी यांनी सांगितले. तसेच दिव्यांगाच्या साहित्य उदाहरणार्थ टॉयलेट खुर्ची. व्हील चेअर,कुबड्डी.तीन चाकी सायकल. वाकर .चष्मा कानाचा मशीनइत्यादी आपल्याकडे असेल तर दिव्यांग सेवा संस्थेस देण्यात यावे ते साहित्य गरजू दिव्यांगांना देण्यात येणार आहे.असेच दिव्यांगांप्रती सतकर्म करण्याचे आव्हान जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख यांनी केले .

तसेच यावेळी ,तालुका सचिव दत्तात्रय खेमनर तालुका सल्लागार बाबुराव शिंदे सर तालुका समन्वयक ह भ प नानामहाराज शिंदे ता.संघटक भास्कर दरंदले टाकळीमिया शाखाध्यक्ष सुरेश दानवे माहेगाव शाखाध्यक्ष भारत आढाव गोटुंबा शाखा उपाध्यक्ष ह भ प आदिनाथ दवने महाराज बा. नांदूर शाखाध्यक्ष शिवाजी जाधव उपाध्यक्ष प्रतिक धिमते राहुरी शहर सचीव जुबेर मुसानी,संदीप कुलकर्णी कोळेकर काका अनिल तनपुरे,सागर जगधने आणी इतर समस्त उपस्थिता चे आभार तालुका संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडे यांनी मानले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!