Disha Shakti

इतर

मरखेल येथे अवैध धंद्याला आला ऊत

Spread the love

देगलूर प्रतिनिधी / ज्ञानोबा सूरनर : देगलूर तालुक्यातील मौजे मरखेल येथे अवैद्य धंद्यांना ऊत आल्यामुळे हे सदरील अवैध धंदे बंद करण्यात यावा यासाठी मा. पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन मरखेल (तालुका देगलूर)यांना निवेदन देण्यात आला आहे. सदरील मौजे मरखेल येथे जुलै महिन्यामध्ये डीवायएस पी. श्री जगताप यांची नेमणूक करण्यात आली होती.

त्यांच्या कार्यकाळात मौजे मरखेल गावामध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद झाले होते. त्यामुळे गावामध्ये सर्वत्र शांतता होती. मात्र त्यांची सप्टेंबर महिन्यामध्ये बदली होताच पोलीस निरीक्षक श्री भोगाडे यांनी मरखेल पोलीस स्टेशनचे चार्ज घेतल्यापासून गावामध्ये अशांतता निर्माण झाली असून गावात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. असे या निवेदनातून म्हटले आहे. सदरील गावात मटका, जुगार, अवैध देशी दारू,गावठी दारू विक्री,अवैध शिंदी विक्री ,गुटखा विक्री,असे एक ना अनेक धंदे सर्रासपणे चालू आहेत.

तसेच पेट्रोल पंपातून बॉटलमध्ये पेट्रोल खरेदी करून प्रत्येकी एक लिटर च्या पाणी बॉटलमध्ये एक लिटर पेट्रोल भरून बेभावात विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे पेट्रोल पंपातील पेट्रोल संपून वाहनधारकांची गैरसोय होत आहे. अशा अवैध धंद्याला आळा बसावा. यासाठी पूर्वीप्रमाणे श्री जगताप यांच्यासारखे प्रामाणिक एकनिष्ठ अधिकाऱ्यांची गावात नेमणूक करण्यात यावी. जेणेकरून गावात अवैध धंदे चालणार नाहीत याबाबत कार्यवाही करण्यास विलंब झाल्यास आम्ही बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहोत यांची नोंद घेण्यात यावी असे निवेदकांनी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.

सदरील निवेदनावर संतोष नामावाड (MASSSसंघटना तालुका अध्यक्ष), यादव भुयारे(MASSसंघटना तालुका उपाध्यक्ष), देविदास भुयारे (MASS संघटना तालुका कोषाध्यक्ष), सुभाष वाघमारे(MASSसंघटना तालुका सचिव)आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!