Disha Shakti

क्राईम

डाॅक्टरांच्या घरातून ५५ तोळे सोने चोरणारा आरोपी जेरबंद* 

Spread the love

 

राहुरी तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर सुरशे 

 

      नगर शहरातील आनंदऋषी हॉस्पिटल शेजारी राहणारे डॉ. ऋषभ फिरोदिया यांच्या घरी चोरी करत 55 तोळे सोने चोरणाऱ्या आरोपीस कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी डॉ. फिरोदिया यांनी त्यांच्या घरातून ५५ तोळे सोने, एक घड्याळ आणि २५ हजार रुपये रोख रक्कम चोरी झाल्याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल केली होती. यावरुन चोरट्यांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 

    गुन्ह्याची कबुली

       गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, ही चोरी राहुरी येथील दीपक पवार याने केली आहे. पोलिसांनी दीपक पवार याचा शोध घेत त्याला मोठ्या शिताफीने अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!