दौंड प्रतिनिधी / प्रकाश घोगरे : बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर निंबोळी येथील रहिवासी असलेले कैलासवासी प्रल्हाद साहेबराव लावंड काका यांचे गेल्या वर्षी निधन झाले असता त्यांचे 18 फेब्रुवारी 2024 रोजी प्रथम वर्ष पुण्यस्मरण संपन्न झाले. व प्रथम पुण्यस्मरण निमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प सौ.नेहा ताई भोसले यांच छान असं कीर्तन ठेवण्यात आलं होतं.
जीवन मरण हे परमेश्वराच्या हातात असते या भूतलावर जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीचा एक ना एक दिवस मृत्यू होणे अटळ आहे नातेवाईक व जवळील व्यक्तींच्या मृत्यूनंतर फार शोक होतो हा मृत्यूशोक शब्दात वर्णन करणे कठीण आहे मृत्यू व्यक्तीचे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ,पाचवे असे अनेक पुण्यस्मरण केले जातात आणि या द्वारे त्यांचे स्मरण केले जाते. पुण्यस्मरण म्हणजे मृत्यूचा स्मृतिदिन या दिवशी अनेक व्यक्ती जाऊन एक वर्ष झालेले असते त्यामुळे पुण्य स्मरण म्हणून हा कार्यक्रम साजरा केला जात असतो तसेच यानुसार देखील असे मानले जाते की दोन वर्षे पूर्ण झाले.
लावंड काकांना आपत्ते नव्हती तर त्यांच्या दोन पुतण्यांनी हे त्यांचे प्रथम पुण्यस्मरण एकदम सांप्रदायिक पद्धतीने साजरी केले या कार्यक्रमात छान असं कीर्तन ठेवण्यात आलं होतं व भोजनाचा कार्यक्रम होता या काकांना दोन पुतणे आहेत श्री. बाळासाहेब बबन लावंड श्री.किसन बबन लावंड या दोन पुतण्यांनी काकांचे पुण्यस्मरण साजरी केले. आजकालच्या मुलांना आई-वडील नीट सांभाळता येत नाहीत पण या दोन पुतण्यांनी सांप्रदायिक पद्धतीने काकांचे पुण्य स्मरण साजरी केले.
Leave a reply