Disha Shakti

इतरसामाजिक

डॉ.विजय अण्णासाहेब मकासरे सामाजिक कार्य या क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार प्रदान

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / जावेद शेख : ध्येय उद्योग समूह पुणे व युवा ध्येय वृत्तपत्र अहमदनगर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येय रत्न पुरस्कार 2024 डॉ. विजय अण्णासाहेब मकासरे सामाजिक कार्य क्षेत्रातील योगदानाबद्दल रविवार दिनांक २१ जुलै २०२४ रोजी अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला. डॉ. विजय अण्णासाहेब मकासरे यांनी महाराष्ट्र गुटखाबंदी करण्यासाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलन करून ते यशस्वी केले. व गुटखाबंदी केली. राज्यभर दारूबंदीसाठी प्रयत्न केले.. रस्त्यावर फिरणाऱ्या अनाथ व दिन दुबळ्या लोकांना कपडे, चपला देऊन त्यांना अनाथ आश्रमात पोहोचवण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले.. कोवीड काळात ॲम्बुलन्स नसताना स्वतः च्या गाडीतून पेशंट हॉस्पिटलमध्ये पोहोचविण्याचे काम करून रुग्णांचे प्राण वाचविले. त्यांच्याकडे पैसे नसताना त्यांचे उपचारांचा सर्व खर्चही उचलला. राज्यस्तरीय कोविड योद्धा पुरस्कार याबाबत मिळाला आहे. गाव पातळी वर दारूबंदी साठी प्रयत्न केले. अनेक भ्रष्टाचारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात आंदोलने केली. यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येय रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा.डॉ.सर्जेराव निमसे सर, प्रमुख अतिथी म्हणून प्रसिध्द युवा उद्योजक व राजेंद्र कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्स चे,संचालक श्री.नितीन एडके हे होते. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री. लहानू सदगिर यांनी केले.

प्रमुख पाहुणे श्री.नितीन एडके यांनी यांनी आपल्या भाषणात युवा ध्येय वृत्तपत्र आणि ध्येय उद्योग समूहाच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत युवा ध्येय वृत्तपत्राच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. दुसरे प्रमुख पाहुणे श्री. विपुल शेठ वाखुरे पाटील यांनी आपल्या मनोगतात कुठल्याही यशामध्ये जिद्द,चिकाटी आणि मेहनत अत्यंत महत्वाची असते असे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात माजी कुलगुरू डॉ निमसे यांनी ध्येय उद्योग समूहाची वाटचाल कशी सुरू झाली व तिचे कार्य कसे चालते या बद्दल अधिक माहिती सांगितली, दैनिक युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक लहानु सदगीर यांनी युवा शब्द कसा सार्थक ठरवला हे देखील त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. आणि ध्येय समूह आणि पुरस्कार मिळालेल्या सन्मानार्थिना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला पुरस्कारारार्थी आपल्या मित्र परिवारासह उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आकाशवाणीचे निवेदक आदिनाथ अन्नदाते आणि भारती कुलकर्णी यांनी केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!