Disha Shakti

सामाजिक

शिक्षक मंगेश पंडीत यांना गरुड फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Spread the love

राहूरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेव वस्ती केंद्र सडे येथील शिक्षक श्री मंगेश पंडीत यांना गरुड फाउंडेशन व युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलिस आयुक्त संदीप भांड हे होते.

यावेळी खासदार निलेश लंके साहेब, माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे, रावसाहेब खेवरे, युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण भोसले, गरुड फाउंडेशनचे कार्याध्याक्ष व आयोजित पत्रकार रमेश खेमनर, गरुड फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश पुजारी हस्ते पुस्कार वितरण झाले. प्राथमिक शिक्षक मंगेश पंडीत यांचे ग्रामीण भागात शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात भरीव योगदान आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी विशेष प्रयत्न त्यांनी केले.

शाळेत अनेक नवोपक्रम करून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यासाठी सतत धडपड करतात. लोकसहभागातून विद्यार्थ्यांसाठी अनेक शैक्षणिक वस्तू त्यांनी मिळवल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुरस्कार घेण्यासाठी मोठ्या संख्येने शिक्षक वृंद व आप्तेष्ट नातेवाईक उपस्थित होते. तसेच सामाजिक, राजकीय, शिक्षण, पत्रकारिता, वैद्यकीय विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!