दिशाशक्ती सटाणा / विट्ठल ठोंबरे : म.वि.प्र. समाज संचलित आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुल, सटाणा येथील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आगळी-वेगळी दिवाळी साजरी केली. डांगसौंदाणे केंद्रातील *जि.प. शाळा चाफ्याचे पाडे (देवपूर) व मोठी भिलाटी* येथील दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांना दिवाळीची भेट म्हणून आदर्श शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शाळेमार्फत आलेल्या वस्तुचे दाते श्री. राजेंद्र पाटील(मंडळ अधिकारी डांगसौंदाणे बागलाण) यांनी त्यांचे वडिल आनंदराव गंगाराम धोंडगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ व श्री. नितीन धोंडगे (नायब तहसिलदार सं.घा.यो. बागलाण) यांनी मदत केली.शिक्षक पालक समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल जाधव, मुख्याध्यापिका श्रीम. वैशाली सोनवणे तसेच सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांनी आणलेल्या वस्तु वाटप करण्यात आले. या प्रसंगी सटाणा बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख मा. श्री. हिरालाल बधान साहेब, याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची किंमत करून तुम्हीही खूप शिका मोठे व्हावं, मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवा. या कार्यक्रमाचे त्यांनी मनापासून कौतुक केले.
शालेय दप्तर, वह्या, कंपासपेटी, पेन्सिल, पेन, गरम कपडे,दिपावली चा फराळ इ. वस्तु प्रत्येक विद्यार्थ्याला वाटप करण्यात आला. आदर्शच्या मुख्याध्यापिका श्रीम. वैशाली सोनवणे, श्रीम. अश्विनी महाले, श्री. विनय सोनवणे, श्री. अविनाश वाघ श्रीम. वैशाली सावंत, श्री.दिपक जाधव, श्री.दिनेश आहिरे, श्री.मनोज पाटील,श्री. योगेश बोरसे, हर्षदा पाटिल,तसेच चाफ्याच्या पाड्याचे मुख्याध्यापक श्री.प्रमोद जगताप, कृतिशील शिक्षक राहुल भामरे, मोठी भिलाटी येथील कृतीशील शिक्षक रौंदळ सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या आगळा-वेगळ्या उपक्रमाचे कौतूक मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीनजी ठाकरे साहेब , श्री.दिलीप (भाऊसा) दळवी (चिटणीस), बागलाण तालुका संचालक डॉ. प्रसादादा सोनवणे , महिला संचालिका श्रीम. शालनताई सोनवणे , शालेय समिती अध्यक्ष श्री. सुनिल दादा सोनवणे व सर्व सदस्य, यांनी सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले.
Leave a reply