अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : अणदूर येथील धडाडीचा युवा मित्र, डॉक्टर शशिकांत तोडकरी यांच्या साई समर्थ क्लिनिकचे उद्घाटन अणदूर मठाचे मठाधिपती शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील , सरपंच रामचंद्र आलुरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दीपक आलुरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कल्याण मुळे, सोसायटीचे चेअरमन सिद्राम शेटे सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अल्पावधीतच नावारुपास व रुग्णांच्या विश्वासास पात्र ठरलेले डॉक्टर तोडकर यांच्या पुनरागमनाने पंचक्रोशीतील रुग्णांना दिलासा मिळाला असून, आई वडील, मित्रपरिवार, रुग्णांचा व साईंच्या कृपेने आपणास पुनर्जन्म प्राप्त झाले असून या संधीचा तळागाळातील रुग्णांच्या सेवेसाठी काम करणार असल्याची भावना यावेळी बोलताना व्यक्त केली.
यावेळी क्लासमेंट ग्रुपच्या वतीने धन्वंतरीचे मूर्ती भेट देण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे, युवा नेते दयानंद मुडके प्रवीण घोडके वैजनाथ मुळे डॉ. अमरदीप कंदले, साहेबराव घुगे, 8 फार्मा ग्रुपचे अजय अणदूरकर, प्रसाद गोगावे, गोविंद शिंदे, गुणवंत मुळे, उमाशंकर चिंचोले, बालाजी जाधव, नागेश चव्हाण, केदार आलूरे, लक्ष्मण चौगुले, सोमनाथ शेटे, महेश करपे पत्रकार चंद्रकांत हगलगुंडे, लक्ष्मण नरे यांच्यासह विविध सामाजिक शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांनी भेटून डॉक्टर शशिकांत तोडकर यांना शुभेच्छा दिल्या.
डॉक्टर तोडकरी यांच्या साई क्लिनिकचे, शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजीं च्या हस्ते शुभारंभ, मान्यवर व मित्रपरिवारांचा सहभाग

0Share
Leave a reply