दिशा शक्ती न्यूज
राहुरी प्रतिनिधी : लाईफ लाईन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल राहुरी दिव्यांग शक्ती सेवा संस्था व मराठा एकीकरण समिती राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 3 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत दिव्यांग बंधू व भगिनींसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे ठिकाण पंढरी मंगल कार्यालय शेजारी मल्हारवाडी रोड राहुरी शिबिराचा तालुक्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या लाभ घ्यावा असे आव्हान हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष धनंजय पानसंबळ यांनी केले आहे. शिबिरामध्ये मोफत डोळे तपासणी करून माफक दरामध्ये चष्म्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच ब्लड प्रेशर, शुगर तपासणी व कन्सल्टिंग चार्जेस मोफत राहतील. गरज पडल्यास छातीची पट्टी (ई.सी.जी) मोफत केली जाईल व डोकेदुखी, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, त्वचेचे आजार, पोटाचे विकार, मणक्याचे आजार अशा सर्व आजारांवर मोफत तपासणी केली जाईल.
अपेंडिक्स, हर्निया, मुळव्याध, फिशर यांची मोफत तपासणी केली जाईल व ऑपरेशन असल्यास हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरात केले जाईल. शिबिराच्या दिवशी औषधे व रक्त चाचणी केल्यास 20 टक्के सवलत देण्यात येईल खास करून हॉस्पिटलच्या बिलामध्ये कोणत्याही दिव्यांग व्यक्तीस 40 टक्के सूट दिली जाईल. जास्तीत जास्त दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष धनंजय पानसंबळ यांनी केले आहे. तसेच शिबिरामध्ये जवळपास 100 दिव्यांगांना रेल्वेपास चे वाटप करण्यात येणार आहे, रेल्वेपास पाच वर्षापर्यंत भारतात कोठेही वापरता येईल रेल्वे पास वर दिव्यांग व्यक्ती व त्याच्यासोबत साथीदार यांना 1/4 तिकीट मिळेल.
शिबिरासाठी प्रहार दिव्यांग संघटनेचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष मधुकर जी घाडगे, देवेंद्र लांबे, शिवसेना राहुरी तालुका, डॉ. मंगेश बागडे, संचालक, अध्यक्ष उत्तर अहमदनगर जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख, आप्पासाहेब ढोकणे, जिल्हा समन्वयक, राहुरी तालुका अध्यक्ष योगेश लबडे, राहुरी तालुका महिला अध्यक्ष सौ. छायाताई हारदे मॅडम प्रमुख उपस्थित राहणार आहे.