राहुरी प्रतिनिधी /ज्ञानेश्वर सुरशे : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा पुकारणारे संघर्ष याेद्धा मनाेज जरांगे पाटील सध्या राज्याच्या दाैऱ्यावर आहेत. मराठा आंदाेलनाची मशाल धगधगत ठेवण्यासाठी शनिवारी (ता. ७) जरांगे पाटील नगर शहरात येत आहे. त्यांच्या सभेसाठी मराठा समाजाकडून जय्यत तयारी करण्यात येत असून सभेला माेठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एमआयडीसी येथे सभा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचा पाठिंबा मिळावा, यासाठी जरांगे पाटील यांचे राज्यभर दाैरे सुरू आहेत. शनिवारी (ता.७) ते नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांची एमआयडीसी येथे सायंकाळी ६ वाजता सभा होणार आहे. मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांची मुदत दिली आहे.
यातील दिवस ३० दिवस पूर्ण झाल्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी जरांगे पाटील मराठा समाजाची सभा घेणार आहेत. यापूर्वी जरांगे पाटील राज्याचा दौरा करीत आहे.
Leave a reply