Disha Shakti

पश्चिम महाराष्ट्र

राहुरी तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, अनेक शेतकऱ्यांचा कापूस भिजला तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : राहुरी तालुक्यात काल रात्री सर्वदूर हलक्या व मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाने विजेच्या कडकडासह हजेरी लावली. रात्री उशीरा मुसळधार पाऊस सुरू होता. काल रात्री 8 वाजण्याच्या सुमारास राहुरी तालुक्यातील बारागावनांदूर, वांबोरी, देवळाली प्रवरा, तांभेरे, गुहा, टाकळीमिया, राहुरी स्टेशन, आरडगाव, वळण, मांजरी, वांबोरी, उंबरे, ब्राम्हणी आदी परिसरात अवकाळी पावसाचे आगमन झाले.

त्यानंतर विजेच्या कडकडाटासह रात्री 9 वाजल्यापासून मध्यम स्वरूपात पाऊस सुरू होता. रात्री 9.45 वाजेनंतर मुसळधार पाऊस सुरू होता. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्या व लागवडींना विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने कांदा रोपावर करपा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर अनेक शेतकऱ्यांची अंतिम कापूस वेचणी चालू असल्याने या अवकाळी पावसामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या मागे हे नवीन संकट उभे राहिले आह़े.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!