पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : वासुंदे गावचे रहिवाशी व कलाक्षेत्रात उत्तम कार्य करत असलेले श्री. भाऊसाहेब महाराज शिक्षण संस्थेतील कलाशिक्षक संतोष पांडुरंग क्षिरसागर यांनी आपल्या हस्तकौशल्याच्या माध्यमातून अनेक कलाकृती तयार केल्या आहेत.
कलेची आवड असल्यामुळे नेहमीच काही तरी नवीन करण्याची उर्मी त्यांच्या मध्ये असते. सध्या सर्व रामभक्तांना अयोध्येतील राममंदिराची ओढ लागली आहे. पुरुषोत्तम श्रीराम राजांचे मंदिर….ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो… तेच आपले स्वप्न पूर्ण होत आहे .बरेच जण हा ऐतिहासिक सोहळा याची देही याची डोळा बघतील ही परंतू सगळ्यांनाच शक्य होईलच असे नाही. म्हणून ठरवलं इथेच शाळेत राहून आपल्या कलेच्या माध्यमातून श्रीरामांना वंदन करूया. ही भावना मनात ठेवून संतोष क्षिरसागर सर यांनी अयोध्या राम मंदिर व श्रीरामांचे सुंदर असे रेखाचित्र परत फलक लेखन केले आहे.
न्यू इंग्लिश स्कूल वासुंदे विद्यालयातील शालेय दर्शनी फळ्यावर रंगीत खडू माध्यमातून आतुरता २२ जानेवारीची या विषयावर फलक लेखनातून रेखाटन करण्याचा प्रयत्न. क्षीरसागर सर यांनी केला आहे. सुंदर लिखाणाद्वारे तसेच उत्कृष्ट चित्रकलाद्वारे संतोष क्षिरसागर हे कलाशिक्षक परिसरातील गावोगावी परिचित झाले असून त्यांच्या लिखाणाचे व त्यांच्या सुवर्ण हस्तअक्षराचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, संतोष क्षिरसागर यांनी आपल्या अंगी असलेली कला जोपासत नेहमीच सामाजिक, वैचारिक विषयांनाही अतिशय महत्त्व दिले आहे.
कलेच्या माध्यमातून संतोष क्षिरसागर हे समाज सेवा करत आहे हे वासुंदेकरांचे भूषणच आहे.क्षिरसागर यांचे हस्ताक्षर ही सुंदर असून डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीही कलाशिक्षक संतोष क्षिरसागर यांनी अडीच वर्षे लिखाण करून ज्ञानेश्वरी ग्रंथ हस्तलिखित लिहिला आहे व त्याही कलेचे संपूर्ण राज्यभर कौतुक झालेले आहे. या अशा उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष सुजित झावरे पाटील, सचिव सुदेश झावरे पाटील, मुख्याध्यापिका श्रीमती नरवडे ए. पी. सरपंच भाऊसाहेब सैद, उपसरपंच शंकर बर्वे, व सर्व शिक्षक वृंद न्यू इंग्लिश स्कूल वासुंदे यांनी विशेष कौतुक केलेले आहे.
वासुंदे विद्यालयातील कलाशिक्षक संतोष पांडुरंग क्षिरसागर यांनी रेखाटले फलकावर श्रीरामांचे रेखाचित्र

0Share
Leave a reply