पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी विनोद गायकवाड यांची श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाचपुते यांनी ही निवड जाहीर केली. यावेळी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाचपुते, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पारनेर तालुका अध्यक्षपदी निघोज येथील बाबाजी वाघमारे यांची तर पारनेर तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे, राम तांबे यांचीही निवड जाहीर करण्यात आली. तसेच श्रीगोंदा येथील दत्तात्रय पाचपुते यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाअध्यक्ष पदी सहाव्यांदा फेरनिवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जोशी यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पारनेर येथील विनोद गायकवाड व कर्जत येथील लियाकत शेख यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. यावेळी पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे, लतिफ राजे, जयसिंग हरेल, आनंद भुकन, सागर आतकर, अविनाश भांबरे तसेच जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष किरण जोशी व जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाचपुते यांनी मार्गदर्शन केले.
निवडीबद्दल पदाधिकाऱ्यांचे सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब खिलारी, कासारे गावचे सरपंच शिवाजी निमसे माळकुपचे सरपंच संजय काळे वडगाव सावताळचे सरपंच संजय रोकडे पळशी गावचे सरपंच प्रकाश राठोड टाकळी ढोकेश्वर उपसरपंच रामभाऊ तराळ, कान्हूर पठारचे किरण ठुबे, म्हसोबा धापचे सरपंच प्रकाश गाजरे, मांडवे खुर्दचे सरपंच सोमनाथ आहेर, ज्येष्ठ पत्रकार बबनराव गायखे, सामाजिक कार्यकर्ते मोहन रोकडे, पत्रकार गणेश जगदाळे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांनी निवडीचे अभिनंदन केले आहे.