मुंबई प्रतिनिधी / भारत कवितके : मुंबईत धनगर आरक्षणावर आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यांनी धनगर आरक्षणासाठी मंत्रालायच्या जाळ्यावर उड्या मारल्या आहेत. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.धनगर आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस जोर धरत आहे. याच मुद्द्यावरून धनगर समाज आज आक्रमक झाला. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचे काही कार्यकर्ते आज मंत्रालयात आले होते. मात्र यावेळी त्यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या. तसेच जोरदार आंदोनल छेडले.
यानंतर गोंधळ निर्माण झाला आहे. धनगर समाजाचे आंदोलक अनिल गोयकर, विजय तमनर, आणि ईश्वर ठोंबरे यांनी मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून जाळीवर उड्या मारल्या कार्यकर्त्यानी सुरक्षा जाळीवर उड्या मारल्याचे पाहून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सुरक्षा जाळीवर उतरून या आंदोलक कार्यकर्त्यांना बाहेर काढलं आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. या घटनेत कोणीही आंदोलकांना गंभीर दुखापत झाली नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. धनगर, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील मेंढपाळ समुदाय अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करत आहेत. केंद्राच्या डेटाबेसमध्ये ‘धनगर’ असा उल्लेख नसून त्याऐवजी ‘धनगड’ हा एसटीचा भाग म्हणून ओळखल्याने कोट्यापासून वंचित राहिल्याचे समुदायाचे म्हणणे आहे. धनगर समाज हे सध्या भटक्या जमातींच्या यादीत आहेत.
Leave a reply