प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : आदर्श इंग्लिश मेडियम स्कूल सटाणा या शाळेत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शिवजयंती निमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. प्रसाद विजय दळवी, जिल्हाध्यक्ष विद्यार्थी काँग्रेसचे सुयोग अहिरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष भाजपा सटाणा हर्षवर्धन सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते योगेश सिसोदे, राष्ट्रवादी युवा प्रदेश कार्यकारणी चे सदस्य सुजित बिरारी, ता. सटाणा :शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. वैशाली सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद कु.प्रसाद दळवी यांनी स्वीकारले. अध्यक्ष व उपस्थित सर्व मान्यवर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून महाराजांची आरती करण्यात आली.
या वकृत्व स्पर्धेसाठी इयत्ता ५ वी ते ९वी चे विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी शाळेतील शिक्षक श्रीम. हर्षिता अहिरे व श्री वाघ अविनाश यांनी पर्यवेक्षकाची भूमिका बजावली. त्यांनी उत्कृष्ट वकृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड केली. त्यात इयत्ता ८वी ची विद्यार्थिनी निमिता ह्याळीज हिने प्रथम पारितोषिक, इ.६वी ची विद्यार्थिनी आर्या वाघ हिने द्वितीय पारितोषिक, इयत्ता ६वी ची विद्यार्थिनी गांगुर्डे जान्हवी हिने तृतीय पारितोषिक मिळवले. इ.७वी ची विद्यार्थिनी सारंगी भदाणे हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांनाचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसाद दळवी व सुयोग अहिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या उपशिक्षिका सारिका कदम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
Leave a reply