राहुरी प्रतिनिधी /ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी शहरातील नगर-मनमाड महामार्गावर पाण्याच्या टाकी परिसरात आज सकाळच्या दरम्यान दुचाकीला एका टॅकरने पाठीमागुन धडक दिली. या अपघातात एक १९ वर्षीय परप्रांतीय तरूण जागीच ठार झाला आहे. तर एकजण किरकोळ जखमी झाला.
या घटनेतील मयत अनंतराम अजय सिंह वय १९ वर्षे, रा. मोहोदीपूर, बीड, सितापूर, जि. सिंधौली, उत्तर प्रदेश हा परप्रांतीय तरूण राहुरी शहरातील भाग्यश्री हाॅटेल येथे कामगार म्हणून काम करत होता. आज दि. ९ नोव्हेंबर २०२४ रोजी त्याला उत्तर प्रदेश येथे आपल्या घरी जायचे होते. त्यामुळे त्याला सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हॉटेल मधील एक साथीदार राहुरीच्या बसस्थानकावर सोडण्यास दुचाकीवरून निघाला होता.
नगर मनमाड राज्य महामार्गावर पाण्याच्या टाकी परिसरात पाठीमागून येणार्या एका टँकरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत अनंतराम अजय सिंह हा रस्त्यावर पडला असता त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला. तसेच त्याचा साथीदार किरकोळ जखमी झाला. घटनेनंतर अनंतराम सिंह याला तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अनंतराम सिंह या तरुणाला उपचारा पुर्वीच मयत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील अपघात झालेले दोन्ही वाहने तसेच टॅकर चालकाला ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तुलसीदास गिते हे करीत आहे.
राहुरी शहरातील नगर-मनमाड महामार्गावर पाण्याच्या टाकी परिसरात टॅकरची दुचाकीला पाठीमागुन धडक ; अपघातात १९ वर्षीय परप्रांतीय तरूण जागीच ठार तर एकजण किरकोळ जखमी

0Share
Leave a reply