श्रीरामपुर प्रतिनिधी / इनायत अत्तार : हरेगाव -श्रीरामपूर रोडवर एस कॉर्नर वस्ती नजीक श्रीरामपूर वरून हरेगाव च्या दिशेने जात असलेल्या बोलोरे वाहनाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरे गाडी एस कॉर्नर वस्ती जवळील मशिदी समोर रात्री नऊ ते सव्वा नऊ च्या दरम्यान भीषण आपघात झाला. हा आपघात एवढा भीषण होता की त्या आवाजाने मशिदी मधील मुस्लिम समाज बांधव नमाज पठण करत असताना ते तात्काळ मदतीस धावले व वस्तीवरील नागरिकांनी मदत कार्यास सुरुवात केली व तात्काळ रुगणवाहिकेस कॉल केला असता रुगणवाहिकेस वेळ लागत असल्याचे पाहून वस्तीवरील मुस्लिम समाज बांधवानी वाहनाचे प्रबंध करून हॉस्पिटल नेहण्यास मदत केली.
या आपघातामध्ये 3 जण जखमी झाले असून त्या मधील एका इसमाची प्रकृती गंभीर असून दोन जणांनाची प्रकृती व्यवस्थितआहे. गंभीर जखमी रुग्णास प्रायव्हेट गाडी मधून तर इतर जखमींना अँब्युलन्स मध्ये टाकून कामगार रुग्णालयात नेण्यात आले आहे. मदत कार्यास एस कॉर्नर वस्तीचे सामाजिक कार्यकर्ता राज खान फ्रेंड्स सर्कलच्यावतीने तातडीची मदत लाभली गाडी चालवणारा हा एस कॉर्नर वर डेटिंग पेंटिंग च वर्क शॉप चालवतो व त्याचे नाव घनशाम असल्याची माहिती मिळाली असून तो गंभीर जखमी आहे
Leave a reply