नांदगाव प्रतिनिधी / खंडू कोळेकर ( दिनांक ४ फेब्रवारी) : संपूर्ण नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सळो की पळो करून सोडणारी जिल्हा बँक व जिल्हा बँकेचे कर्मचारी सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना सक्तीची वसुली व जप्तीच्या नोटिसा देऊन शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल केले आहे. एका बाजूला सरकार कर्जमाफीच्या घोषणा व आश्वासन देत आहे व दुसऱ्या बाजूला बँकेचे सक्तीची वसुली व जप्तीची हालचाल सुरू आहे तरी अशा परिस्थितीत कोणीतरी विशेषता लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांचे कैवारी होऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे व यात काहीतरी तोडगा काढण्याचे काम करावे अशी विनंती शेतकरी वर्ग करीत आहे.
बँकेचे कर्मचारी पिंपराळे गावात आले असता शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते यात तोडगा निघाला .नाहीतर शेतकऱ्यांवर उपासमारी व आत्महत्येची वेळ आल्याशिवाय राहणार नाही आणि अशी जर वेळ कोणा शेतकऱ्यावर आले तर त्यास सर्वस्वी बँक व बँकेचे अधिकारी d o बँक विभागीय अधिकारी सचिव व इतर बँकेचे अधिकारी जबाबदार असतील आणि अशा संकट समय आपल्या पाठीशी तालुक्यात कोणीच उभे राहत नाही का अशी खंत सगळीकडे ऐकायला मिळत आहे.
Leave a reply