तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात तीरंगी लढत होत असून महायुतीचे राणा दादा पाटील, महा आघाडीचे धीरज पाटील, तर समाजवादी पार्टीचे देवानंद भाऊ रोचकरी असी अटीतटीचा सामना पहावयास मिळत आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात तुळजापूर तालुक्याचे युवा नेते तथा तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन, माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे सुपुत्र सुनील मालक चव्हाण यांच्या एन्ट्री मुळे राणा दादांचा विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे प्रतिक्रिया जाणकार मतदारातून ऐकावयास मिळत आहे.
तुळजापूर मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तब्बल सहा वेळेस या मतदारसंघाचे नेतृत्व माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले असून गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे चव्हाण यांना फटका बसल्याने त्यांचा पराभव झाला. यात राणा दादा पाटील यांनी या मतदारसंघात अवघ्या अडीच वर्षात हजारो कोटीचे विकास काम केल्याने मतदार राजा खुश आहे. विविध विकास योजना, प्रकल्प, लाडकी बहीण योजना, किसान सन्मान योजना, राज्यातील प्रथम बसव सृष्टी, विविध समाजातील व धर्मियांना, विकास निधी दिलाने विकासाचा अजेंडा कायम ठेवल्याने सर्व थरातून स्वागत केले जात आहे.
अणदूर जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक दादा आलूरे, अर्चनाताई पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अस्मिता ताई कांबळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष दयानंद मुडके, युवा नेते मल्हार दादा पाटील, शहराध्यक्ष दीपक दादा घोडके, काशिनाथ शेटे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शिवदास कांबळे गुरुजी, धनराज मुळे सहकार्यकर्त्यानी गाव भेटी ,जनसंवाद, प्रत्यक्ष मतदारांना भेटून विकासाचे जनक राणा दादा पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार बांधला असून मतदार राज्यातून विशेषतः महिला वर्गातून प्रचंड व प्रतिसाद मिळत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.
हा मतदारसंघ परंपरागत असला तरी महाआघाडीत बिघाडी झाल्याने महायुतीचे उमेदवार तथा सर्व समावेशक विकासभिमुख नेतृत्व राणा दादांच्या रूपाने मिळाल्याने आणि ऐनवेळी सुनील चव्हाण यांच्या एन्ट्री मुळे महायुतीचेउमेदवार राणा दादांची गढी मजबूत झाल्याची प्रतिक्रिया ऐकवयास मिळत आहे. अवघ्या चार दिवसावर येऊन ठेवलेल्या या निवडणुकीत राणा दादांच गुलाल उधळणार असे मतदारातून बोलले जात आहे.
तुळजापूर मतदारसंघात राणा दादांचे पारडे जड सुनील मालकांची प्रचारातील आघाडीमुळे महायुतीचे राणा दादांचा विजय निश्चित

0Share
Leave a reply