इंदापूर प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : रविवार दिनांक २५ जुन २०२३ रोजी सुनील उदावंत यांच्या निंबोडी येथील विहिरीत मागील तीन दिवसांपूर्वी एका खोल विहिरीत कोल्हा पडला होता त्याला वर काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण यात यश येत नव्हते. या कोल्हाला बाहेर काढण्यासाठी खाली उतरून बाहेर काढणे गरजेचे होते पण तो कोल्हा होता. कोल्हा म्हंटले की प्रत्येकाला भीती वाटणारच ना. शेवटी मदनवाडी येथील नवनाथ सुतार याच्याशी संपर्क साधला कारण त्यांनी या अगोदर शेळी, मेंढी, कुत्रा, साप यांना जीवनदान दिले आहे व अशा कार्यात ते नेहमीच अग्रेसर असतात.
नवनाथ सुतार यांनी लागलीच उदावंत यांची निंबोडी येथील विहीर गटली व त्या ६० ते ७० फूट खोल विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या नसताना रस्सीच्या साहाय्याने कोल्हा पर्यंत पोहचले व त्यांनी त्या कोल्ह्याला एक पोत्यात भरले व रस्सीच्या साहाय्याने वर दिले व त्याला वर आल्यावर सोडून दिले. कोल्हाने तीन दिवसानंतर सुटका झाल्यामुळे तो ही आनंदाने पळून गेला यावेळी उपस्थितांनी नवनाथ सुतार यांचे आभार मानले.
Leave a reply