प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धेच्या अंतिम निकाली कुस्तीत शिवराज राक्षे (पुणे), विरुद्ध महेंद्र गायकवाड (साेलापूर) यांच्यात लढत झाली. या स्पर्धेची खास आकर्षण ठरलेली अर्धा किलाे साेन्याच्या गदेचा मानकरी सोलापूरचा महेंद्र गायकवाड ठरला. कुस्ती खेळताना राक्षे याच्या पायाला दुखापत झाल्याने गायकवाडला विजयी घोषित करण्यात आले.
सोन्याची गदा खास आकर्षण
भारतीय जनता पक्ष, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघातर्फे राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धा आयाेजित करण्यात आल्या हाेत्या. या स्पर्धेत ३५ लाखाची अर्धा किलो सोन्याची गदा खास आकर्षण ठरली हाेती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अर्धा किलो सोन्याची गदा गायकवाडला बक्षीस म्हणून देण्यात आली.पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आदी उपस्थित हाेते.
Leave a reply