भारत कवितके / मुंबई कांदिवली : गुरुवार दिनांक 14सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी सात वाजता कांदिवली पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, गणेश मूर्ती कार, कांदिवली पोलीस ठाणे मधील अधिकारी, पोलीस यांची संयुक्त बैठक कांदिवली पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप विश्वासराव यांचे मार्गदर्शन खाली संपन्न झाली.या बैठकीत कांदिवली पोलीस ठाणे हद्दीतील एकूण 47 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, मूर्ती कार,व कार्यकर्ते मिळून जवळ जवळ 95 ते 100 जण उपस्थित होते.
या बैठकीत संबंधित आस्थापना विभाग कडून योग्य परवाने घेणे, गणेश मूर्ती चे आगमन व विसर्जन संबंधी पोलीस ठाणे ला माहिती देणे, गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी न होता सुरळीतपणे चालू राहावी म्हणून दक्षता घेणे,कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मदत करणे, प्रत्येक मंडळाने आपल्या गणेशाची सुरक्षा करणे,मंडप परिसर स्वच्छ ठेवणे,संशयीत व्यक्ती,वाहन,यांची माहिती पोलिसांना देणे, गणेशोत्सव मंडळांने गणेशोत्सव काळात पारंपरिक वाद्यांचा वापर करावा,डी जेच्या वापर टाळावा,अशा प्रकारे सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप विश्वासराव, जनसंपर्क पोलीस अधिकारी सदाशिव सावंत, प्रकाश घाडगे यांनी मंडळांच्या दिल्या.हिंदी भाषा दिनाचे औचित्य साधून जयशंकर सिंग ठाकूर यांनी संदिप विश्वासराव व सदाशिव सावंत यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या बैठकीत मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप विश्वासराव यांनी सांगितले की, अनंत चतुर्दशी म्हणजेच गणेश विसर्जन व ईद ए मिलाद हे दोन्ही एकत्र येत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांवर ताण पडणार आहे, धार्मिक ताण तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.गणेशोत्सव जल्लोषात, उत्साहात,आनंदात साजरा करा,पण कायद्यानुसार.
या वेळी निंबाळकर,सोहन कदम हे पोलीस अधिकारी, मुन्नाभाई शेख, जयशंकर सिंग ठाकूर, कांदिवली येथील पत्रकार, साहित्यिक, व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके,मनोज, आदी सह पुरुष व महिला पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात बैठकीत उपस्थित होते.
Leave a reply