दिशाशक्ती प्रतिनिधी /इनायत आत्तार (श्रीरामपूर) : सहा.पशुधन विकास अधिकारी डॉ. बी. व्ही पावसे सेवानिवृत्ती सोहळ जीवनामध्ये अनेक प्रकारच्या तपस्या असतात, त्यामध्ये ज्या – त्या वर्णा मध्ये वेगवेगळ्या आश्रम व धर्माप्रमाणे असतात आपण ज्या ठिकाणी कार्य करतो तेथे तेच कार्य प्रामाणिकपणे व सेवाभावी वृत्तीप्रमाणे करणे ही साधना म्हणजेच तपस्या असुन प्रत्येक साधना आप-आपल्या परीने असते, जे प्राणी बोलु शकत नाही अशा पशुची सेवा करणे महान व मोठे कार्य असुन ते काम डॉ. भरत पावसे यांनी केले असल्याचे प्रतिपादन स्वामी चैतन्यानंद भारती महाराज यांनी श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. भरत पावसे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमप्रसंगी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील सहाय्यक आयुक्त डॉ. सलिम शेख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अ. नगर जिल्हा पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेचे नितीन निर्मळ,डॉ. उमेश पंडुरे, डॉ. विजय दिमते, जाफराबादचे सरपंच संदिप शेलार नायगावचे सरपंच डॉ.रा.ना. राशिनकर, उपसरपंच चंद्रसेन लांडे, सोसा. माजी अध्यक्ष सुनिल लांडे, नांदेडचे प्रविणराव मुळे, श्रीरामपूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदिप जगताप,गुड मॉर्निग ग्रुपचे रमेश गायकवाड, थोरात मामा ,सह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना महंत स्वामी चैतन्यानंद महाराज म्हणाले,करोना काळात वैद्यकिय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टराना लोक देव मानत होते, कोरोनाप्रमाणेच मागील वर्षी लंपी आजारीने थैमान घातले होते, त्यावेळी पशुधन वाचवण्यासाठी देवदुत म्हणून पशुसेवेतील डॉ. कामी आलेले असुन पशुवैद्यकिय डॉ. बी.व्ही. पावसे यांनी चांगले कार्य केले असुन अनेक जनावरांना वाचवले असल्याचे गौरवोदगार महंत स्वामी चैतन्यानंद भारती यांनी काढले.
याप्रसंगी पुण्याचे सहायक आयुक्त डॉ. सलिम शेख म्हणाले पशुवैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला 24 तास सेवेसाठी तत्पर राहावे लागते ,कुठलेही पशुधन वाचवण्याचे मोठे कौशल्य यासाठी पणाला लावावे लागत असते, तेच काम अनेक ठिकाणी कार्यरत असतांना सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ.भरत पावसे यांनी केले असून त्यांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेली गर्दी हीच त्या कामाची पावती असल्याचे उदगार डॉ. सलीम शेख यांनी काढले.यावेळी डॉ. उमेश पंडुरे, डॉ. नितीन निर्मळ, प्रसाद पावसे, अर्चना पांडे, सुनिल लांडे, सरपंच राजाराम राशिनकर आदीचे भाषणे झाली.
![]()
याप्रसंगी संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र – मुंबई च्या वतीने जिल्हाध्यक्ष तथा जय बाबाचे कार्य. संपादक मनोजकुमार आगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष संदिप जगताप यांच्या हस्ते कार्य गौरवाचे सन्मानपत्र तर नायगांव जाफराबाद ग्रामपंचायत च्या वतीने ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र सरपंच डॉ. राशिनकर व सरपंच संदिप शेलार यांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी डॉ.भोंडे, बाळासाहेब देसाई, शकिल पटेल, गणेश देसाई, राहुल थोरात, विजय भडांगे, बाबासाहेब औताडे, सह परिसरातील शेतकरी, पशुपालक उपस्थित होते. निवृत्त मुख्याध्यापक आदिनाथ पावसे, सौ. शिलाताई पावसे, सौ.नेहा पावसे, आदीसह डॉ.पावसे परिवार उपस्थित होता.
Leave a reply