बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : बिलोली तालुक्यातील कासराळी येथे राम जन्मभूमी अयोध्या धाम येथील प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्षदा बिलोली तालुक्यातील मौजे कासराळी आणण्यात आल्या. अक्षदा विठ्ठलेश्वर मंदिर येथून पांडुरंगाची आरती करून सर्व गावकरी व प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीरामाचे विधिवत पुजन करून नारळ फोडून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले. विश्व हिंदू परिषद कासराळी व ग्रामपंचायत कासराळी यांच्या वतीने अक्षदाचे वाटप घरोघरी करण्यात आले.
22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या येथील श्रीरामलला चा मूर्ती प्राणप्रतिष्ठापना होणाऱ्या भव्य दिव्य कार्यक्रमाचे निमंत्रण अक्षदाच्या माध्यमातून देण्यात आले. त्यावेळी लक्ष्मण ठक्करवाड जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस, डाॅ.के.बी.कासराळीकर ता.अध्यक्ष डॉक्टर सेल काँग्रेस पार्टी, सुर्यकांत सावकार महाजन, चंद्रशेखर पा.सावळीकर भाजपा ता.अध्यक्ष, भागवत सेठ लोकमनवार प्रतिष्ठित व्यापारी, सोमलिंग पाटील कासराळीकर, दत्ता पाटील नरंगले, उपसंरपंच कल्पना दंतापल्ले,व्दारका गंगुलवार ग्रा.पं.सदस्य, संदीप पाटील रामपुरे ता.अध्यक्ष युवा मोर्चा, विठ्ठल पाटील शिंदे, शिवाजी पाटील कासराळीकर, राजेश सावकार, सायन्ना गजलोड, योगेश उपलंचवार,शंकर गंगुलवार, साईनाथ गंगुलवार ग्रा.पं.सदस्य, माधव ठक्करवाड, सचिन कोटगिरे, बालाजी गंगुलवार, विश्व हिंदू परिषदेचे बांधव,गावातील प्रतिष्ठित नागरिक, महीला, तरूण युवक यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.
बिलोली तालुक्यातील कासराळी येथे भक्तिमय वातावरणात अयोध्यातून आलेल्या अक्षदाचे घरोघरी वाटप

0Share
Leave a reply