विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार (श्रीरामपूर) : नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काल श्रीरामपूर नगरपालिकेने शहरातील नेवासा रस्त्यावरील अतिक्रमण हटविले. सुमारे 65 अतिक्रमण धारकांवर कारवाई करत अनेकांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. नगरपालिकेचे प्रशासक किरण सावंत पाटील व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे. तर उद्या (सोमवारी) संगमनेर रोडवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहे.
आजपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यावर असणारे अतिक्रमण हे वाहतुकीस अडचणीचे ठरते. त्यामुळे असे अतिक्रमण काढण्याबाबत प्रशासक किरण सावंत पाटील व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी आदेश दिले होते. त्यानुसार काल शहरातील नेवासा रोडवरील अतिक्रमण हटविण्यात आले. टपर्या, पत्राचे दुकाने तसेच दुकानासमोर ठेवण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले. अतिक्रमण विभागातील विभाग प्रमुख संजय शेळके, प्रशांत जगधने, सुनिल केदारे, राम शेळके, गौरव काळे, कैलास जगदाळे आदी कर्मचार्यांनी ही कारवाई केली. दरम्यान, उद्या संगमेनर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाने दिली.
श्रीरामपूर पालिकेचा नेवासा रोडवरील 65 अतिक्रमणांवर हातोडा, नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कारवाई ; आज संगमनेर रोडवरील अतिक्रमण हटविणार

0Share
Leave a reply