मुंबई कांदिवली/भारत कवितके : कांदिवली पूर्व अहिल्यादेवी होळकर चौक, लोकमान्य चाळ कमेटी नंबर १,वडार पाडा रोड नंबर १, हनुमान नगर कांदिवली पूर्व या ठिकाणी रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० :३० ते दुपारी ४ या वेळी मायाक्का देवी ची भव्य पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे ट्रस्ट चे अध्यक्ष कुंडलीक सरगर,व सचिव महादेव करांडे यांनी आमचे प्रतिनिधी भारत कवितके मुंबई कांदिवली यांना सांगितले आहे.श्री मायाक्का देवी सेवा ट्रस्ट वर्धापन दिनानिमित्त तीन दिवस भव्य सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजता रामायणाचे अखंड पारायण सुरु होईल.शनिवार दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १२ वाजता रामायण पारायण ची सांगता होईल.दुपारी २ ते ५ होमहवन व प्रसादाचा कार्यक्रम होईल.रात्री ८ ते १२ वाजता सौ.सुनिताताई मासाळ यांचे किर्तन,श्री.दत्त सांप्रदायिक भजनी मंडळ व श्री मायाक्का देवी महिला मंडळ यांचा हरिजागर चार कार्यक्रम होईल.रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ६ ते ९ अभिषेक होमहवन पूजा, सकाळी १०:३० ते दुपारी ४ पालखी मिरवणूक सोहळा, दुपारी ३:३० ते रात्री १० महाप्रसाद आणि सायंकाळी ७ ते रात्री ११ या वेळी पारंपरिक धनगरी ओव्या चा जंगी सामना होईल.
या सोहळ्यास धनगर समाजातील समाज बांधव भगिनी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन श्री मायाक्का देवी सेवा ट्रस्ट यांचे कडून करण्यात आले आहे.
कांदिवली पूर्व मध्ये श्री मायाक्का देवी सेवा ट्रस्ट वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

0Share
Leave a reply