Disha Shakti

Uncategorized

माण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत वंचितने उघडले खाते! आ.जयकुमार गोरेच्या गावात वंचितचा शिरकाव

Spread the love

शिखर शिंगणापूर प्रतिनिधी /शाहीनाज मुजावर : आंधळी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकित वंचित बहुजन आघाडी पक्षाचे जिल्हा राजकीय निरीक्षक इम्तियाज नदाफ यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुरस्कृत वंचित रयत पॅनल उभा केला होता. सलग तीन पंचवार्षिक निवडणुका लढवित संघर्षाची हॅट्रीक पूर्ण करीत असतानाच पत्रकार अतुल खरात यांच्या रूपाने पहिला ग्रामपंचायत सदस्य निवडून आला आहे. विद्यमान आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जयकुमार गोरे यांनी स्वतः गावच्या राजकारणात उतरत आपली प्रचंड ताकत पणाला लावली होती. मात्र सरपंच पदासाठी त्यांनाही काँग्रेस मधून उमेदवार आयात करावा लागला होता. त्याचबरोबर शिवसेना सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शेखर भाऊ गोरे यांनीही आंधळी गावातील स्थानिक परिवर्तन ग्रूपच्या उमेदवारांना पाठिंबा देत गावातून स्वतः पायी चालत रॅली काढून विजयासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली होती. त्याचबरोबर राष्ट्रवादीनेही विद्यमान जिल्हा परिषद सदस्याच्या नेतृत्वात थेट सरपंच पदा सहित चार उमेदवार मैदानात उतरविले होते.मात्र भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, या तीनही मातब्बर पक्षांना पॅनल पूर्ण करता न आल्याने दुसऱ्या वॉर्ड मधून उचलाव उमेदवार देण्याची नमुष्कीली आली. अशातच वंचित बहुजन आघाडीने राजकारणातली मत्सद्देगिरी दाखवत एकच वॉर्ड मध्ये स्थानिक उमेदवार देत सरपंच पदा सहित चार उमेदवार रिंगणात उतरवले होते.

या परिस्थितीत आमदार जयकुमार गोरे यांनी गावातील अनेक लोकांचा स्वतःच्या हस्ते भाजप पक्षप्रवेश घेत केलेल्या प्रयत्नांना यश मिळत सरपंच पदा सहित ७ उमेदवार विजयी झाले. तर स्थानिक परिवर्तन ग्रूप चे २ व शिवसेनेचा अधिकृत एकच सदस्य निवडून आला.राष्ट्रवादी काँग्रेसला खाते ही उघडता आले नाही.अशातच वंचित बहुजन आघाडीने इतिहास घडवत थेट पक्षाच्या अधिकृत पॅनल मधून एक सदस्य निवडून आणण्यात यश मिळवले.या यशाबद्दल दस्तूरखुद्द बाळासाहेब आंबेडकर यांनी इम्तियाज नदाफ यांचे फोनवरून अभिनंदन केले. या विजयामध्ये वंचीतचे वडुजचे नगरसेवक तुषार बैले व प्रतिक बडेकर यांनी आपल्या टीम सोबत आंधळी गावात उतरून प्रचाराची धुरा सांभाळली होती.मिळवलेल्या या यशा बद्द्ल वंचितचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!