विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : मॅजिक्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमेशन प्रतापसिंग राठौर आयोजित व्हिडिओ एडिटिंग वर्कशॉप ची आज सांगता झाली. हा कार्यक्रम प्रियंका विकास महिला मंडळ सौ.प्रियांका अजय जनवेजा यांच्या व टीम 99 यांच्या माध्यमातून पार पडला. आजच्या डिजिटल युगामध्ये टेक्नॉलॉजी सोबत आपणही अपग्रेड व्हावं म्हणून व्हिडिओ शूटिंग व त्याची एडिटिंग कशी करायची हे या तीन दिवसीय वर्कशॉप मध्ये प्रतापसिंग राठौर यांनी शिकवले. मुली व महिलांचाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यावर वर्कशॉप मधील सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले. अतिशय आनंदात सर्व कार्यक्रम पार पडला.
या सांगता सोहळ्यामध्ये प्रतापसिंग राठौर, शुभांगी ब्राह्मणे, प्रियंका जनवेजा, अजय जनवेजा तसेच अतिथी म्हणून पूजा जोशी, वैभव ढुस हे उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये मेहंदी आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट व इतर वेगवेगळ्या फिल्ड मधील महिला व मुलींचा समावेश होता.
मॅजिक्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमेशन प्रतापसिंग राठौर आयोजित व्हिडिओ एडिटिंग वर्कशॉपची सांगता

0Share
Leave a reply