Disha Shakti

क्राईम

वांबोरी येथे शेतवस्तीवर महिलेस घातक हत्याराने गंभीर जखमी करून जबरी चोरी करणारे दोन आरोपी राहुरी पोलिसांकडून अटक

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : दि.30/03/2024 रोजी सत्रे वस्ती वांबोरी येथील महिला ही रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घरासमोरील बाथरूम मध्ये गेली असता तिला दोन अनोळखी आरोपींनी घातक शस्त्रने गंभीर दुखापत करून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता त्या अनुषंगाने राहुरी पोलीस ठाणे येथे दि.30/03/2024 गुन्हा क्रमांक 362/2024 भादवि कलम 394, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता .

त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास पीएसआय खोंडे हे करत होते त्यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व राहुरी पोलीस स्टेशनचे पोनि संजय ठेंगे यांना गोपनिय माहीती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी राहुरी परिसरात लपून बसले आहेत व ते मिळुन येतील अशी खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने पोनी संजय ठेंगे यांनी तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी पीएसआय खोंडे व तपास पथकातील अंमलदार यांना बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेशित केल्याने नमुद ठिकाणी जाऊन सापळा रचुन सदर आरोपी क्र.1) रवींद्र पोपट सत्रे, वय अठरा वर्ष, राहणार सत्रे वस्ती कात्रड, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर आरोपी क्र.2) किरण संजय राऊत वय 22 वर्ष राहणार राऊत वस्ती ब्राह्मणी रोड वांबोरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांना शिताफिने ताव्यात घेण्यात आले आहे व त्यास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर आरोपींना माननीय न्यायालय यांनी चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे करीत आहेत.

सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सो,, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. कलुबरमे सो, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. बसवराज शिवपुजे सो, यांचे मार्गदर्शना खाली प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोसई सी आर खोंडे, सहाय्यक फौजदार भराटे, पोहेकॉ/ पालवे पोहेकॉ/ सुरज गायकवाड, पोहेकॉ/ राहुल यादव, पो.कॉ/ प्रमोद ढाकणे, पो.कॉ/ सचिन ताजने, पो.कॉ/ नदीम पो.कॉ/ इफ्तेखार सय्यद पो.कॉ/ अंकुश भोसले, पो.कॉ/ सतीश कुराडे, पो.कॉ/ गोवर्धन कदम, गोपनीय अशोक शिंदे, पोलीस नाईक सचिन धानंद, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांनी केली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!