श्रीरामपूर प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूर जिल्हा अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न,भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सर्वांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच जन्मोउत्सव निमित्ताने अनाथ आश्रमातील गरीब व गरजूवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमात जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष विलास पाटणी,जिल्हा संघटक डॉ.संजय नवथर, श्रीरामपूर शहराध्यक्ष सतीश कुदळे,विधानसभा अध्यक्ष भास्कर सरोदे,आदी मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंती निमित्त श्रीरामपूर मनसेच्या वतीने अनाथ आश्रमात शालेय साहित्य वाटप..

0Share
Leave a reply