लातूर प्रतिनिधी (दिशाशक्ती) : लातूर तालुक्यातील हरंगुळ खुर्द या छोट्याशा गावामध्ये धनगर समाजाचे नेते तथा सत्तेतील भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर हे आज घोंगडी बैठकीसाठी हजर होते.
लातूर पासून जवळच असलेल्या हरंगुळ खुर्द येथे शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी धनगर समाजाचे नेते तथा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे घोंगडी बैठकीसाठी दाखल झाले असता द ग्रेट अहिल्यादेवी होळकर ग्रुप हरंगुळ खुर्दच्या वतीने गोपीचंद पडळकर यांचे हरंगुळ खुर्द येथे आगमन होताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून समाज बांधवांनी क्रेन जेसीबीच्या साह्याने हार घालून भव्य असे स्वागत केले.
यावेळी सोनाजी भंडे, बाळासाहेब होळकर, सुशील होळकर, ज्ञानदेव होळकर, आकाश चीगुरे, लक्ष्मण होळकर, बाळू होळकर, दयानंद होळकर तसेच गावचे सरपंच मनोहर झुंजे पाटील उपसरपंच आनंद धोंडीराम पवार व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.गोपीचंद पडळकर यांच्यावर हरंगुळ खुर्दमध्ये द ग्रेट अहिल्यादेवी होळकर ग्रुपच्यावतीने क्रेनद्वारे पुष्पवृष्टी करून स्वागत

0Share
Leave a reply