पारनेर प्रतिनिधी / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील पळसपूर या गावची प्रसिद्ध असणारी श्री भगवती देवी मातेच्या यात्रेनिमित्त पळसपूर ग्रामस्थ व श्री भगवती देवी क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि क्रिकेट स्पर्धा रविवारी दि. २१ एप्रिल ते मंगळवार दि. २३ एप्रिल या दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश फी एक हजार रुपये असणार आहे. प्रथम नाव नोंदवणाऱ्या संघांना या स्पर्धेत प्रवेश देण्यात येणार आहे. तरी सर्व क्रिकेट शौकिनांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संजय आहेर व पळसपूर ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे हे १३ वे वर्ष आहे,तसे पाहिले तर पळसपूर हे गाव पहिल्यापासूनच क्रिकेट प्रेमी म्हणून ओळखले जाते, पळसपूर या ग्रामीण भागातील गावामध्ये पूर्वीपासूनच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक जालिंदर आहेर, संजय आहेर, संजयशेठ कुंडलिक आहेर यांच्या वतीने २१ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक भाऊसाहेब रेपाळे यांच्या वतीने पंधरा हजार रुपये, तृतीय पारितोषिक दत्ताशेठ आहेर, सचिन आहेर, तुषार आहेर यांच्या वतीने दहा हजार रुपये देण्यात येणार आहे. त्याशिवाय चौकार हॅट्रीक, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज,मॅन ऑफ द मॅच फायनल यासाठी रोख रक्कम आणि ट्राॅफी अशी बक्षीसांची लयलूट असणार आहे. समालोचक म्हणून मयुर शिंदे, गोकुळ आहेर , तुषार शिंदे व विष्णू आहेर सर हे असणार आहे.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ मंगळवार दि.२४ एप्रिल रोजी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पळसपूर येथे करण्यात येणार असल्याचे आयोजक श्री भगवती देवी क्रिकेट क्लब व संजय आहेर यांनी सांगितले.अधिक माहितीसाठी आयोजक श्री भगवती देवी क्रिकेट क्लब, पळसपूर यांच्याशी संपर्क साधावा.
Leave a reply