विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील जुने नायगाव या द्विशिक्षकी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थी हितासाठी ग्रामस्थ व पालकांच्या सहकार्याने अनेक उपक्रम राबवून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे.असे गौरवो्दगार जिल्हा नियोजन अधिकारी दिपक दातीर यांनी जि.प. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी काढले.तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे कठीण काम यशस्वीपणे या शाळेतील दोन्ही शिक्षक करत असून त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केले.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे,शिक्षक नेते राजकुमार साळवे,शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलिमखान पठाण,संघाचे राज्य प्रसिद्धीप्रमुख रविकिरण साळवे, शिक्षक बँकेचे संचालक गोरक्षनाथ विटनोर,संचालक बाळासाहेब सरोदे, विकास मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दळवी,सरपंच डॉ.राजाराम राशिनकर, उपसरपंच पुष्पाताई लांडे, किरण खैरे, अनिल पंडित, अनिल ओहोळ,माजी उपसरपंच मिनाताई लांडे,पोलीस पाटील राजेंद्र राशिनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संपत नाना लांडे होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी शाळेचा गेल्या पाच वर्षातील उंचावलेल्या प्रगतीचा आलेख वाचून दाखवला.मान्यवरांच्या हस्ते विविध गुणदर्शन स्पर्धा,क्रीडा स्पर्धा यामध्ये यश मिळविलेल्या शाळेतील दोन्ही शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा कै.गोरक्षनाथ लांडे यांच्या स्मरणार्थ इंजि.किरणकुमार लांडे यांच्या सौजन्याने ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांनी शाळेत राबविलेल्या बाला उपक्रमाचे विशेष कौतुक करून वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल शाळेचे अभिनंदन केले.शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे यांनी व्यासपीठावरच विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष इंग्रजी वाचन घेऊन पालकांशी थेट संवाद साधला. जिल्हा शिक्षक नेते राजकुमार साळवे,शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलिमखान पठाण,केंद्रप्रमुख राजू इनामदार यांनी वार्षिक स्नेहसंमेलनाचे उत्कृष्ट नियोजन,शाळेत केलेली विद्युत रोशनाई,तालुक्याच्या टोकाला असलेली एक सुंदर शाळा,मिशन आपुलकी अंतर्गत लोकसहभागातून शाळेचा झालेला कायापालट,विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये झालेला गुणात्मक वर्तनबदल याबद्दल शिक्षक व ग्रामस्थांचे कौतुक केले. वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शेतकरी नृत्य,देशभक्ती महापुरुषांच्या कार्याची महती सांगणारे नृत्य, बालगीते, रिमिक्स गीते आदि गीतांवर चित्तथरारक व लक्षवेधी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. उपस्थित सर्व ग्रामस्थ, पालकांनी हजारो रुपयांचे बक्षीसे दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल ओहळ यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश लांडे,उपाध्यक्ष अशोक वाघ,माजी अध्यक्ष संतोष राशिनकर,सौ.मनिषा महेश राशिनकर,जालिंदर राशिनकर,सुनिल दातीर,किरणकुमार लांडे,किरण दातीर,महेश राशिनकर,सुभाष तुपे,अविनाश लांडे,सुरेश राशिनकर, रविंद्र दरेकर,यशवंत लांडे,दिपक राशिनकर,सुरेश तुपे, दिगंबर लांडे, श्यामसुंदर लांडे,सागर नजन,सचिन भुसारी,माजी उपसरपंच संजय राशिनकर, मुख्याध्यापक संतोष वाघमोडे, शिक्षिका सुजाता सोळसे, बलभीम लहारे,भिमा धसाळ, डॉ.संदीप लांडे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक, महिला,तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी आभार मानले.
Leave a reply