पारनेर प्रतिनिधी /गंगासागर पोकळे : नाशिक येथील सह्याद्री फार्म या शेतकऱ्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या कंपनीला पारनेर तालुक्यातील १५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी भेट दिली शेतकऱ्यांच्या या सहलीचे आयोजन अंजना सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी केले होते.
सह्याद्री फार्म ही कंपनी नाशिक जिल्ह्यातील ७०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी एकत्र येत स्थापन केली आहे या कंपनीच्या माध्यमातून विदेशामध्ये शेतकऱ्याचा शेतीमाल बांधावरून पाठवला जातो. या कंपनीने प्रक्रिया उद्योगही त्या ठिकाणी उभे केले आहेत. ही शेतकऱ्यांची कंपनी असून शेतकऱ्यांच्या माध्यमातून चालवली जाते. पारनेर तालुक्यातील जवळा, निघोज, आळकुटी, सुपा, भाळवणी, पारनेर, कान्हूर पठार, वासुंदे, मांडवे खुर्द, टाकळी ढोकेश्वर व ढवळपुरी, या भागातील शेतकऱ्यांनी या कंपनीला भेट देत कंपनी विषयी माहिती जाणून घेतली.
पारनेर तालुक्यामध्ये कांदा, टोमॅटो, वाटाणा, मिरची ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. प्रक्रिया उद्योग पारनेर तालुक्याच्या पठार भागावर उभे राहावेत हा उद्देश समोर ठेवून विश्वनाथ कोरडे यांनी पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सह्याद्री फार्म या प्रकल्पाचा पाहणी दौरा आयोजित केला होता.
यावेळी विश्वनाथ कोरडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सह्याद्री फार्म ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी एकत्र येत उत्पादक कंपनी स्थापन केली. हा ऍग्रो प्रकल्प शेतकऱ्यांसाठी पंढरपूरच आहे. याच कंपनीच्या धरतीवर पारनेर तालुक्यामध्ये यापुढील काळात प्रक्रिया उद्योग उभे करण्यात येणार आहे आणि तालुक्यातील पारनेर भूमिपुत्र नावाने शेतकऱ्यांचीच कंपनी स्थापन करणार आहोत यामुळे या कंपनीच्या माध्यमातून आपल्या पारनेर भागातील पिकांवर आपल्याला प्रक्रिया करून ते जगाच्या बाजारपेठेमध्ये पाठवणे शक्य होईल.पारनेरच्या पठार भागावर शेतकरी उत्पादक कंपनी
पारनेर तालुक्यामध्ये कांदा, वाटाणा, मिरची व टोमॅटो यासारखी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. शेतकऱ्यांना एकत्र करत पारनेर भूमिपुत्र या नावाने पठार भागावर लवकरच शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणार आहे. या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभे करणार असून शेतीमालासाठी कोल्ड स्टोरेज निर्माण करणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी हे करत असताना राजकारण विरहित काम करणार असल्याचे यावेळी भाजप नेते विश्वनाथ कोरडे यांनी सांगितले.
Homeकृषी विषयीसह्याद्री फार्म शेतकऱ्यांसाठी पंढरपूरच; भाजप नेते विश्वनाथ कोरडे नाशिकच्या सह्याद्री फार्मला पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची भेट
सह्याद्री फार्म शेतकऱ्यांसाठी पंढरपूरच; भाजप नेते विश्वनाथ कोरडे नाशिकच्या सह्याद्री फार्मला पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची भेट

0Share
Leave a reply