राहुरी विद्यापीठ / आर. आर. जाधव : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख व संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. नितीन दानवले यांच्या देखरेखीखाली कृषि विद्यापीठातील बियाणे विक्री केंद्रात फुले समर्थ या कांदा बियाण्याची विक्री सुरू करण्यात आली. यावेळी पहिल्या दिवशी कांदा बियाणे विक्रीला शेतकर्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी डॉ. बी.टी. शेटे, डॉ. कैलास गागरे, सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्ष शेटे व बियाणे विभागातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
कांदा बियाणे विक्रीच्या सुलभतेसाठी विद्यापीठाने यावर्षी कांदा उत्पादक असणार्या नाशिक, अहिल्यानगर व सातारा जिल्ह्यातील कृषि विद्यापीठाच्या अनेक केंद्रांमध्ये बियाणे विक्री व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील कृषि संशोधन केंद्र, निफाड, कांदा लसूण व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत, कृषि महाविद्यालय, मालेगाव या ठिकाणी विक्री करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव, कृषि विज्ञान केंद्र, धुळे, कृषि महाविद्यालय, पुणे येथेही विक्री होत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, कृषि महाविद्यालय, हळगाव, जामखेड, नगर-पुणे रस्त्यावरील कृषि संशोधन केंद्र, चास व कृषि संशोधन केंद्र, सावळीविहीर, ता. राहाता या ठिकाणी फुले समर्थ बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे 7288 किलो बियाणे व उर्वरित नऊ जिल्ह्यातील विक्री केंद्रामध्ये 3712 किलो असे मिळून 11.0 टन कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. नितीन दानवले यांनी सांगितले.
Homeकृषी विषयीमहात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कांदा बियाणे विक्रीस पहिल्या दिवशी शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कांदा बियाणे विक्रीस पहिल्या दिवशी शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद

0Share
Leave a reply