दिशाशक्ती / जावेद शेख : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना यांच्या वतीने राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांचे मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे ठिकठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात यावेळी शिरसगांव ता. श्रीरामपूर येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय या ठिकाणी नवीन अधिकारी रुजू झाल्याने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मा.श्री. अनंता जोशी यांचा तालुका अध्यक्ष राजेंद्र देसाई यांच्या हस्ते तसेच सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मा.श्री.गणेश डगळे यांचा जिल्हा निवड समिती अध्यक्ष चंद्रकांत झुंरगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे कार्य राज्यभरात कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले, तसेच परिसरात मोठ्या संख्येने ट्रि गार्डसह वृक्षारोपण करणार असल्याची माहिती चंद्रकांत झुंरगे यांनी दिली.
यावेळी वृक्षारोपण करताना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, मोटार वाहन निरीक्षक धर्मराज पाटील, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत झुरंगे, तालुका अध्यक्ष राजेंद्र देसाई, शहर अध्यक्ष अमोल कदम, शहरउपाध्यक्ष सल्लाउद्दीन शेख, सचिव गौरव शेटे, समता कॉमन सर्व्हिस सेंटर चे संचालक सरताज शौकत शेख, प्रताप शिंदे, जियां शेख, वजीर पठाण, गणेश गायकवाड, निखिल गायकवाड, समाधान शिरसाठ, शंकरराव लबडे, जिशांत शेख, आण्णा दाभाडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सल्लाउद्दीन शेख यांनी केले तर आभार अमोल कदम यांनी मानले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय या ठिकाणी वृक्षारोपण व सन्मान सोहळा संपन्न

0Share
Leave a reply