राहुरी प्रतिनिधी : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती शिवधर्म प्रतिष्ठान, राहुरी खुर्द यांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावातील दहावी व बारावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. गुणगौरव सत्कार समारंभात कु. श्रेया गोसावी, कु. प्राची कुलकर्णी, कु. सई भोरे, कु. भक्ती ढोकणे व कु. श्रद्धा शेंडे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी प्रतिष्ठानचे सदस्य निखिल चौभारे, अमोल जाधव, सुशिल तोडमल, हर्ष पालवे, शंतनु घोरपडे, गणेश भडांगे, विशाल शेटे, कुणाल शेटे, सिद्धार्थ डोळस व ओंकार नजन हे उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना हर्ष पालवे व सुशिल तोडमल यांनी केली, तर आभार प्रदर्शन निखिल चौभारे यांनी मानले.
राजमाता आहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राहूरी खुर्द येथील शिवधर्म प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0Share
Leave a reply