Disha Shakti

क्राईम

दुसरे लग्न करण्यासाठी विवाहितेचा छळ ; पती व सासू विरोधात गुन्हा दाखल

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : लग्नात हुंडा दिला नाही तसेच दुसरे लग्न करण्यासाठी सोडचिठ्ठी द्यावी. या कारणावरून सासरच्या लोकांकडून तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. तरुणीच्या फिर्यादीवरून सासरच्या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रेश्मा सुनिल साळवे, वय २८ वर्षे, रा. चिंचविहीरे, ता. राहुरी, हल्ली रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटल, रेश्मा साळवे यांचा पती सुनिल कारभारी साळवे हा काश्मीर येथे आर्मी मध्ये नोकरीस आहे. त्यांचा विवाह दि. २४ जून २०१८ रोजी झाला आहे.

लग्नानंतर सासरच्या लोकांनी रेश्मा साळवे यांना सुमारे तिन ते चार महीने चांगले नांदविले. त्यानंतर सुनिल साळवे सुट्टीला घरी आल्यानंतर काही ना काही कारणावरुन रेश्मा यांच्याशी भांडण करुन शिवीगाळ दमदाटी करुन कंबरेच्या पट्ट्याने व लाथाबुक्क्यांनी नेहमी मारहाण करत असत. तसेच सासू देखील मारहाण करीत असे. दि. ७ जुलै २०२४ रोजी सायंकाळी सुनिल साळवे हा दारु पिऊन आला व रेश्मा यांच्याशी विनाकारण भांडण करुन त्यांना बेदम मारहाण केली व म्हणाले की, तुला मुलगा होत नाही, तुझ्या आईने मला लग्नात हुंडा दिला नाही, तुझ्या आईकडुन मला दोन लाख रुपये घ्यायचे आहेत.

व मला दुसरे लग्न करावयाचे आहे. तुझ्यामुळे मला दुसरे लग्न करता येत नाही, तू मला सोडचिठ्ठी दे. त्यावेळी रेश्मा यांनी सोडचिठ्ठी देण्यास नकार दिल्याने त्यांच्या पतीने पुन्हा शारीरीक व मानसीक त्रास देवुन मारहाण केली. तसेच रेश्मा यांच्या तोंडात फिनेलची बाटली ओतली. रेश्मा सुनिल साळवे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुनिल कारभारी साळवे व मंदा कारभारी साळवे, रा. चिंचविहीरे, ता. राहुरी, यांच्यावर गु.र.नं. ८२२/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ३ (५), ३५१ (२), ३५१ (३), ३५२, ८५, ८६ (ब) प्रमाणे शारीरीक व मानसीक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!