प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : नेवासा तालुक्यातील माका येथे एका विवाहित महिलेचा गळा आवळून खून झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की पुजा अशोक गोरे (वय 22) हिचा विवाह चार वर्षापूर्वी माका येथील अशोक अर्जुन गोरे याच्याशी झाला होता. काही दिवस सासरच्या मंडळींनी सुखाने नांदवले. परंतु तू तुझ्या वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणत तिचा शारीरिक व मानसिक छळ तिचे सासरची मंडळी करु लागले. दि. 15 रोजी सकाळी 11 ते दि. 16 रोजी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी घरातून निघून गेल्याने तीला गळा आवळून जिवे ठार मारले. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी माका शिवारात पाटाच्या पाण्यात टाकून दिला असल्याचे गणेश मच्छिंद्र एडके (रा. मुथलवाडी ता. पैठण) यांनी दाखल फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
दि. 17 रोजी सोनई पोलीस ठाण्यात अशोक अर्जुन गोरे, पांडुरंग अर्जुन गोरे रा. माका यांचे विरुद्ध गुन्हा र. नं. 193/2025 बीएनएस चे कलम 103 (1), 238, 84, 115 (1), 352, 351 (1), (2), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती समजताच शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी, पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे तसेच उपनिरीक्षक काकासाहेब राख यांनी घटना स्थळी भेट देऊन पहाणी करत आरोपींना तातडीने ताब्यात घेतले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी हे करत आहेत.
Leave a reply