Disha Shakti

इतर

नाऊरचे कामगार तलाठी अविनाश तेलतुंबडे यांची बदली, ग्रामस्थांच्यावतीने सत्कार

Spread the love

श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायतअत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील तलाठी अविनाश तेलतुंबडे भाऊसाहेब यांनी आपल्या नाऊर जाफराबाद भागात आपल्या कार्यकाळात नागरिकांना उत्कृष्ठ सेवा दिली त्याच त्यांच्या कामाची ग्रामस्थांनी दखल घेऊन त्यांची बदली झाली असता नागरिकांनी त्यांचा यथोचित सत्कार करून निरोप दिला. त्यांनी लोकांची कामे करताना जबाबदारी व सेवा म्हणून काम केलेले आहे. रात्री उशिरापर्यंत आपले काम करणारे तलाठी भाऊसाहेब आत्तापर्यंत कोणीच बघितलं नसेल . श्रीरामपुर तालुक्याला लाभलेले तहसीलदार प्रशांत पाटिल साहेब व नाऊरला लाभलेले तलाठी अविनाश तेलतुंबडे भाऊसाहेब याचीं कर्तव्यदक्षता दुसऱ्या कोणत्याही अधिकार्यांत बघायला मिळणार नाही.कुठलाही लोभ / पैसा म्हणून कधीच काम केले नाही आणि अशा चांगल्या व्यक्ती शक्यतो मिळत नसतो म्हणून ” अशा कर्तबगार अधिकाऱ्याचा ग्रामस्थांनी  रविवारी 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता तेलतुंबडे भाऊसाहेबांचा जाफराबाद निलेश निंगल याच्या दुकाना जवळ येथे छोटासा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शब्बीर पटेल, निलेश निगळ, अर्जुन सोनवणे, राजू पटेल, चंद्रकांत गहिरे, नूरमोहम्मद अत्तार, सागर गांगुर्डे, सुभाष निगळ , सोमनाथ नागळ, लखन हुरे इत्यादी नागरिक यावेळी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!