राहाता प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : बजरंगदल लोणी शहर यांनी वेळोवेळी प्रबोधन करून, देशी गोवंश कत्तलीसाठी कसायांना न विकता, त्याचे जतन व संवर्धन करण्याची मोहीम सुरू केलीय, त्यामुळे लोणी व प्रवरापरिसरात अनेक शेतकऱ्यांनी बजरंगदलाशी सम्पर्क करून आपल्या कडे असलेले गोवंश कत्तली साठी न विकता मोफत बजरंग दल यांच्या मार्फत गोशाळेत सोडत आहेत. त्याच आव्हानाला प्रतिसाद देत आज दिनांक 26 मे 2025 रोजी राजुरी येथील शेतकरी प्रकाश भालेराव व आकाश जाधव या शेतकऱ्यांनी आपल्या कडील अंदाजे 1 लाख रुपये किंमतीचे गोवंश बजरंग दल लोणी यांच्याकडे दिले.
व सर्व बजरंग दलाच्या बजरंगीनी त्यांना उज्वल गोरक्षण केंद्र मांची येथे सुखरूप पोहच केले. यावेळी सामजिक कार्यकर्ते प्रसाद घोगरे, बजरंगदल अध्यक्ष सागर राक्षे, राधु आहेर, बाळू लोखंडे, गणेश माळी, अमन शेख, विजू ढगे, राहुल घोगरे उपस्थित होते.
Leave a reply