नाशिक प्रतिनिधी / खंडू कोळेकर : नाशिक रोड येथील देवळालीगाव परिसरात धक्कादायक प्रकार घडला असून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीने छेड काढणाऱ्या युवकाच्या व त्याच्या कुटुंबियातील व्यक्तीना कंटाळून आत्महत्या केली आहे. याबाबत नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देवळाली गाव राजवाडा येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही देवळाली कॅम्प येथील महाविद्यालयात शिकत होती. रस्त्याने येता जाता गुलाबवाडी येथील कलाम इजहार मन्सूरी (वय २२) हा युवक तिची छेड काढत लग्न करण्याचा आग्रह करीत होता. त्याच्या कुटुंबातील काही लोकदेखील आमच्या कलाम बरोबर लग्न करण्यासाठी त्या मुलीकडे तगादा लावत होते.
या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने विहितगांव येथील पुलावर विषारी औषध सेवन केले. त्यानंतर तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून युवक कलाम, त्याची आई व इतर नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी करीत आहे.
Leave a reply