Disha Shakti

इतरराजकीय

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोसळल्या प्रकरणी कारवाई करावी “शिवभक्त चंद्रकांत लबडे” यांची मागणी

Spread the love

दिशाशक्ती शेवगाव  : मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक प्रशासनाच्या निष्कृष्ट कामामुळे ८ महिन्यांत कोसळल्याबद्दल जाहीर निषेध करण्यात आला. या घटनेची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जर सदरील घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. अनथा पुर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शिवभक्त चंद्रकांत महाराज लबडे, पत्रकार ज्ञानेश्वर फसले, तारामती दिवटे, अक्षय बोडखे, शिवाजीराव काटे, शितल पूरनाळे, भरत लोहकरे, एकनाथ कूसळकर, माउली धनवडे,अकाश कुह्राडे, दादा रसाळ, दत्तात्रय फुंदे, सुरेश कोरडे, संजय नागरे, भुसे सर, दिपक शेडे, ज्ञानेश्वर खबाले,विष्णु घनवट,महेश मीसाळ , गोरख भापकर, पांडुरंग नाबदे या सह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!