Disha Shakti

सामाजिक

साई आदर्श मल्टीस्टेटच्यावतीने अँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान…..

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : साई आदर्श मल्टीस्टेटच्यावतीने राहुरी तालुका अँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा सोमवारी राहुरी फॅक्टरी येथील मुख्य शाखेत सत्कार सोहळा पार पडला. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजी आप्पा कपाळे,विष्णूपंत गिते,योग प्रशिक्षक किशोर थोरात,शिवाजी जाधव,ऋषभ लोढा आदी उपस्थित होते. प्रास्ताविक निवेदक संघटनेचे सल्लागार राजेश मंजरे यांनी केले.विष्णूपंत गिते,योग प्रशिक्षक किशोर थोरात,शिवाजी आप्पा कपाळे यांनी मनोगत व्यक्त करत राहुरी तालुक्यातील सर्व निवेदकांचे कौतुक केल. कार्यक्रमाची शोभा व रंगत वाढवण्याचे काम सर्व निवेदक उत्कृष्ट करत आहेत. प्रत्येक सोहळ्यात अनेकांच शब्द सुमनांनी आगळवेगळे स्वागत निवेदक करत असतात. आम्हास निवेदक सहकाऱ्यांचा अभिमान वाटतो.असे प्रतिपादन शिवाजी कपाळे यांनी केले. अँकर असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष बापूसाहेब तनपुरे यांनी सत्कारला उत्तर दिले.

याप्रसंगी अँकर असोशियनचे उपाध्यक्ष, गणराज्य न्युजचे संपादक गणेश हापसे, कार्याध्यक्ष आप्पासाहेब ढोकणे, सल्लागार राजेश मंचरे, खजिनदार-साईनाथ कदम, संघटक- राजू कोतकर, सहसंघटक- निखिल कराळे आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे तर ,आभार गणेश हापसे यांनी मानले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!