Disha Shakti

इतर

सोनई-राहुरी रस्त्यावर रुग्णवाहिका व स्विफ्ट कारचा अपघात, पाच गंभीर जखमी.

Spread the love

दिशाशक्ती सोनई / ज्ञानेश्वर सुरशे : सोनई-राहुरी रस्त्यावरील साईराम उडपीसमोर रुग्णवाहिका व स्विफ्ट कारचा अपघात होऊन पाच गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी सोनईकडून राहुरीकडे जात असलेली स्विफ्ट कार (एम एच २० डी व्ही ६२२२) व समोरून मृतदेह घेऊन आलेली रुग्णवाहिका (एम एच २० वाय ५७४) यांच्यात सोनई-राहुरी रस्त्यावरील साईराम उडपीजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातात रुग्णवाहिकेतील तिघे व स्विफ्ट कारमधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना शासनाच्या १०८ रुग्णवाहिकेतून डॉ, बाबासाहेब शिरसाट यांनी पुढील उपचारासाठी नेले आहे. मंगळवारी दुपारी वंजारवाडी येथील अंबादास एकनाथ डोंगरे या तरुणाने वंजारवाडी शिवारात आंब्याच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून वंजारवाडी येथील युवक घेऊन जात असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती कळताच वंजारवाडी ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. या अपघातात अजय बडे, अनिल दराडे, पंकज दराडे हे जखमी असल्याची माहिती समजली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!