Disha Shakti

इतर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या लढ्याला डॉ. मीनल ताई खतगावकर यांचा जाहीर पाठिंबा

Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : उमरी तालुक्यातील मौजे बोळसा येथील महादेव मंदिर येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या साखळी उपोषणाला भेट देत पाठिंबा जाहीर केला. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे शासन दरबारी निवेदने देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कुठलाच मोबदला मिळत नसल्याने उमरी, नायगाव, धर्माबाद या तालुक्यातील शेतकरी सहभागी होत आहेत.आज बोळसा येथे नवव्या दिवशी इज्जतगाव ता.नायगाव येथील शेतकरी बांधवांनी भगवानराव मनूरकर यांच्या नियोजनाखाली चालू असलेल्या साखळी उपोषणात सहभागी होत जाहीर पाठिंबा दिला यात मीही सहभाग नोंदवला.

यापूर्वी अतिवष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना तात्काळ मोबदला मिळावा यासाठी शासनाला निवेदन दिले होते.त्याबरोबरच शासनाने उपोषणकर्ते शेतकरी बांधवांची तात्काळ दाखल घ्यावी आणि सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा येणाऱ्या काळात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा माझ्यासह उपोषणकर्त्ते शेतकऱ्यांनी दिला.

याप्रसंगी हनमंतराव पाटील चव्हाण,बाळासाहेब पाटील खतगावकर व्हाईस चेअरमन नरसिंह सूतगिरणी, प्रा. रवींद्र पाटील चव्हाण, नानाराव पाटील शिंदे सरपंच,दत्ताहरी पाटील कावलगुडेकर, माधवराव पाटील शिंदे, मधुकर पाटील शिंदे, गोविंदराव माली पाटील इज्जतगावकर, बाबाराव पाटील शिंदे,विलास गोविंदराव पाटील इज्जतगावकर, विठ्ठल पाटील शिंदे, बाबुराव पाटील शिंदे,विजय पाटील कदम भायेगावकर,वेंकटराव पाटील कवळे, रामेश्वर पाटील जाधव कुदळेकर, कैलास पाटील हातनीकर,बापूराव पाटील, तिरुपती पाटील जाधव,बाबुराव माली पाटील इज्जतगावकर, शिवाजी पाटील ईजतगावकर चेअरमन,बाबुराव मोहनराव पाटील,दिलीप पाटील इज्जतगावकर, बालाजी पाटील सूर्यवंशी,आनंदराव पाटील कवळे, कैलास पाटील कवळे, शंकर पाटील खतगावकर,संतोष पाटील पुयड रामतीर्थकर यांच्यासह परिसरातील बहुसंख्या शेतकरी बांधव उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!